Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

maharashtra police
, मंगळवार, 25 एप्रिल 2023 (08:46 IST)
राज्याच्या गृह मंत्रालयाने विशेष पोलीस महानिरीक्षक पदाच्या 16 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना प्रतीक्षेत ठेवले असून प्रतीक्षेच्या यादीमध्ये असलेल्या दोन अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
 
गृहमंत्रालयाचे अवर सचिव वेंकटेश भट यांनी आज राज्यातील विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना प्रतीक्षेच्या यादी ठेवली असून त्यांच्या जागी मनोज लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
प्रतीक्षेच्या यादीत असलेले मिलिंद मोहिते यांना पोलीस अधीक्षक गुन्हे पुणे येथे बदली देण्यात आली आहे. राजलक्ष्मी शिवणकर यांना समादेशक राज्य राखीव पुणे या पदावर ती नियुक्ती देण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते त्यांना आता नियुक्ती मिळाली आहे.
 
संजय दराडे यांची बदली पुणे अन्वेषण विभाग पुणे येथे करण्यात आले आहे. एच. डी कुंभारे यांची दहशतवाद विरोधी पथकामध्ये बदली करण्यात आली आहे. एम आर दुर्य यांची बदली राज्य राखीव पोलीस दल पुणे येथे करण्यात आली आहे. संजय शिंदे यांची पिंपरी चिंचवडला बदली करण्यात आली आहे. डी. एस. चव्हाण यांची संभाजीनगरला विशेष पोलीस महानिरीक्षक या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
 
डी. आर. सावंत यांची सागरी सुरक्षा या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. अरबी डहाळे यांची संचालक गुप्तवार्ता अकादमी येथे बदली करण्यात आली आहे. अशोक मोराळे यांची नागपूरला राज्य राखीव पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. एस एच महावरकर यांची नांदेड येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. निसार तांबोळी यांची पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात बदली करण्यात आली आहे.
 
एच.डी. येनेपुरे यांची गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे. के.एम मलिकार्जुन यांची पोलीस महासंचालकांच्या अस्थापना कार्यालयात बदली करण्यात आली आहे. जे. डी सुपेकर यांची कारागृह विभाग पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

१५ लाख मुलांच्या पूर्वतयारीसाठी राज्यभरात ६५ हजारहून अधिक शाळांमध्ये मेळावे-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर