Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

Triple Murder तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरले, पतीने क्रिकेटच्या बॅटने केली पत्नी आणि मुलांची हत्या

murder
, गुरूवार, 21 डिसेंबर 2023 (20:31 IST)
Triple Murder ठाण्यातून एक वेदनादायक बातमी समोर आली आहे. येथे हरियाणातील एका व्यक्तीने दारूच्या नशेत पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांची क्रिकेटच्या बॅटने हत्या केली. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फरार आहे. कासारवडवली पोलीस ठाण्याच्या अधिका-यांनी सांगितले की, हरियाणातील हिसार येथील खरालीपूर गावात राहणारा 29 वर्षीय अमित धरमवीर बागरी याने ही तिहेरी हत्या घडवून आणली.
 
आरोपी हा मद्यपी आणि बेरोजगार आहे
त्याने पत्नी भावना, 8 वर्षांचा मुलगा अंकुश आणि 6 वर्षांची मुलगी खुशी यांची हत्या केली. आरोपी धरमवीर बागरी हा दारुडा आणि बेरोजगार असल्याचे ठाणे पोलिसांनी उघड केले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती घरमालकाने दिली होती. पोलिसांच्या पथकाने त्याच्या घरातून एक क्रिकेट बॅट जप्त केली आहे, ज्याने त्याने पत्नी आणि मुलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांचे मृतदेह घरात रक्ताने माखलेले आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागरी हा मद्यपी होता आणि कोणतेही काम नसल्यामुळे तो त्रस्त होता. त्यामुळे त्यांच्या घरात वारंवार भांडणे होत होती.
 
पतीच्या भावाच्या घरी गेली होती पत्नी
या भांडणांना कंटाळून पत्नी भावना आपल्या मुलांसह काही दिवसांपूर्वी अमितचा भाऊ विकास बागरी याच्या घरी गेली होती. ती मुलांसह सिद्धिविनायक निवास, शेंडोबा चौक येथे स्थलांतरित झाली होती. काही दिवसांपूर्वी अमित बागरी पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी भावाच्या घरी आला आणि त्यांच्यासोबत राहू लागला. आज सकाळी त्याचा भाऊ विकास बागरी कामावर गेला असताना अमितने मागून ही घटना घडवली. दुपारी विकास बागरी हे घरी परतले असता त्यांना घरात वहिनी व दोन मुलांचे मृतदेह आढळून आले. रक्ताने माखलेली क्रिकेटची बॅटही दिसली. त्यानंतरच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
 
महाराष्ट्राबाहेर फरार झाल्याचा संशय आहे
आता पोलिसांनी आरोपी अमितला पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. तो महाराष्ट्राबाहेर फरार झाल्याचाही संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तीन दिवसांपासून त्याच्या भावाच्या घरी कुटुंबासोबत शांततेत राहत होता, मात्र आज अचानक त्याने ही घटना घडवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिहेरी हत्येमागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साक्षी मलिकने केली कुस्ती सोडण्याची घोषणा, पत्रकार परिषदेत ढसाढसा रडली