Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुकाराम मुंढे दिवाळीनिमित्त गावाकडे त्यामुळे येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची चांगलीच झोप उडाली

tukaram mundhe
, गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (14:47 IST)
तुकाराम मुंढे दिवाळीनिमित्त गावाकडे आले आहेत. गावाकडील दौऱ्यात बीड जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना भेटी देऊन आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची चांगलीच झोप उडाली. मुंढे यांचा दौरा हा 25 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या कालावधी होत आहे. आपल्या दौऱ्यात त्यांनी बीड जिल्हा रुग्णालयास भेट दिल्याने तेथील आरोग्य अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाल्याचा पाहायला मिळालं.
 
तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याबाबतच्या सुचना केल्या. तसेच रात्री अचानक तपासणी करण्यासाठी राज्यभरात एकाचवेळी सुचना केल्या होत्या. बीडमध्येही चऱ्हाटा, नाळवंडी येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. यात डॉक्टर गैरहजर आढळले होते. त्यानंतर आयुक्तांनी सर्वच अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन रूग्णसेवा सुधारण्याबाबत सुचना केल्या होत्या. आता स्वत: तुकाराम मुंढे हेच ऐन दिवाळीत बीड दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्यात त्यांनी आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेटी देण्यासह आढावा घेणार असल्याचे सांगितले होते.
 
त्यानुसार, बीडच्या जिल्हा रुग्णालयाला तुकाराम मुंढेंनी सायंकाळच्या वेळी अचानक भेट दिली आणि तिथल्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली. यावेळी त्यांनी कामात कुचराई करणाऱ्या आणि रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलंच झापलंह. तसेच सायंकाळच्या वेळेस त्यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्याने वेगवेगळ्या वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूसही केली.
 
आयसीयु विभागालाही भेट
 
तुकाराम मुंढेंनी अति दक्षता विभागाची पाहणी केली, त्यावेळी औषधाचे रेकॉर्ड त्यांना आढळून आलं नाही, त्यामुळे, तेथील कर्मचाऱ्यांना सज्जड दम देत, काम जमत नसेल तर नोकरी सोडून द्या अशा शब्दात कानउघडणी केली. मुंढेंच्या सरप्राईज व्हिजीने अनेक डॉक्टरांना ऐनवेळी व्यवस्थित उत्तर देखील देता आली नाहीत, त्यामुळेही मुंढे चांगलेच संतापले होते.
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इगतपुरीसह या ४ रेल्वे स्टेशनवर सुरू होणार ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’; ग्राहकांना मिळणार ही सुविधा