Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

TVF च्या अरुणाभ कुमार विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा

TVF  च्या अरुणाभ कुमार विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा
ऑनलाईन एंटरटेनमेंट चॅनेल ‘द व्हायरल फीवर’ (TVF) चे सीईओ आणि संस्थापक अरुणाभ कुमार याच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.  
 
मुंबईच्या एमआयडीसी पोलीस स्थानकात एका पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 2016 मधील असून, त्यावेळी पीडित तरुणी TVF च्या ऑफिसमध्ये मुलाखतीसाठी गेली होती. यावेळी अरुणाभ यांनी तिच्याशी अश्लिल चाळे केल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरु केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जीएसटीचा मार्ग मोकळा