Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पिसोरा शिकार प्रकरणी ठोसेघर येथील दोन जण अटकेत

पिसोरा शिकार प्रकरणी ठोसेघर येथील दोन जण अटकेत
, शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (08:12 IST)
पिसोरा या वन्यप्राण्याच्या शिकार प्रकरणी ठोसेघर , सातारा येथील दोघे जण वनविभागाच्या जाळयात अडकले असुन त्यांच्या राहत्या घरातून पातेल्यात शिजवलेले मांस जप्त करण्यात आले असुन आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना २ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे
 
 मिळालेल्या माहीतीनुसार सातारा तालुका वनविभागाचे वन क्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांच्या पथकाने मध्यरात्री ठोसेघर येथील आरोपी बाबुराव रामचंद्र जाधव व रघुनाथ विठ्ठल चव्हाण यांच्या राहत्या घरी भेट देऊन तपास केला असता जर्मनच्या पातेल्यात पिसोरा वन्यप्राण्याचे मांस शिजवल्याचे आढळुन आले व वनक्षेत्रात जाऊन शिकार केल्याची त्यांनी कबुलीही दिली असुन त्यांना वन्यजीव व वनआधिनियम या कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

सातारा उपवनसंरक्षक महादेव मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण वनपाल अरूण सोळंखी वनरक्षक अशोक मालप राजकुमार मोसलगी साधना राठोड महेश सोनावले श्रीकांत दुर्गै अश्विनी नरळे शेखर शिरतोडे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जाता जाता आयुक्त दीपक पाण्डेय यांनी घेतला हा मोठा निर्णय