Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन शेतकरी भावांनी नेले पहिल्यांदा रायरेश्वराच्या किल्ल्यावर ट्रॅक्टर

tractor
, शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (12:47 IST)
ट्रॅक्टर शेतात कामासाठी वापरले जाणारे साधन आहे.शेतीकामात सोय व्हावी या साठी ट्रॅक्टर वापरले जाते. भोर तालुक्यात किल्ले रायरेश्वर पठारावर शेतीसाठी चक्क 4  हजार 694 फूट उंचीवर शेतीसाठी ट्रॅक्टर नेले आहे. ज्या किल्यावर जाण्यासाठी साधी पायवाट नाही या किल्ल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या, लोखंडी शिडीचा वापर केला जातो. किल्ल्यावरून  ये-जा करताना जीव मुठीत घ्यावा लागतो. 

त्या रायरेश्वराच्या किल्यावर किल्ला परिसरात पसरलेल्या पठारावर राहणाऱ्या कुटुंबांना शेतीकामाच्या सोयीसाठी किल्ल्यावर राहणाऱ्या दोन शेतकरी बंधूंनी ट्रॅक्टर खरेदी करून आणले आणि थेट 4 हजार 694 फूट उंच किल्यावर नेण्याचे धाडसी काम केले आहे. अशोक जंगम आणि रवींद्र जंगम असे या भावांचे नाव आहे. 

हे भाऊ शेतीचा व्यवसाय करतात आत्ता पर्यंत पारंपरिक पद्धतीने शेतीचे काम व्हायचं आता त्याला यांत्रिकरणाची जोड मिळाली आहे. त्यांनी ट्रॅक्टर विकत घेतले आणि आता ट्रॅक्टर वर कसे न्यायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी ग्रामस्थांची मदत घेऊन ट्रॅक्टरचे मोठे पार्ट वेगळे करून किल्यावर जाऊन एकत्र करण्याचा विचार केला आणि ट्रेक्टरचे अवजड पार्ट वेगळे करून ट्रॅक्टर किल्ल्यावर लोखंडी पायऱ्या चढून जाऊन  किल्यावर पोहोचल्यावर पुन्हा जोडण्यात आले .अशा प्रकारे इतिहासात प्रथमच रायरेश्वराच्या किल्ल्यावर ट्रॅक्टर आणले. 
या भावांच्या किमयाची चर्चा आणि कौतुक सर्वत्र केले जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी उपयुक्त वरई :आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३