Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिन्नरजवळील रस्त्यात भरधाव वाहनाच्या धडकेत पल्सरवरील दोघा मित्रांचा मृत्यु

सिन्नरजवळील रस्त्यात भरधाव वाहनाच्या धडकेत पल्सरवरील दोघा मित्रांचा मृत्यु
, शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (08:40 IST)
सिन्नरजवळील महामार्गावर झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा जागीच मृत्यु  झाला आहे.अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पल्सर दुचाकीवरील असणा-या दोन तरुणांचा मृत्यू झाला.अपघात घडल्यानंतर वाहनचालक फरार झाला आहे.सचिन चकोर  (वय 28, संजीवनीनगर, सिन्नर) आणि शिवम गिते  (वय 18, ढोकेनगर, सिन्नर) असे अपघाती मृत तरुणांचे नावे आहेत.याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
 
याबाबत अधिक माहितीनूसार,सचिन आणि शिवम हे दोघे जीवलग मित्र होते. ते पल्सर दुचाकीवरून मुसळगावाकडून सिन्नरकडे येत होते.या दरम्यान, समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक  दिली.या अपघातात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.सिन्नर नगरपरिषद रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.दोघा मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान वाहनचालक फरार असून त्याचा शोध पोलिस  घेत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओबीसी आरक्षण : सुधारित अध्यादेशावर राज्यपाल यांची झाली स्वाक्षरी