suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उल्हासनगर गोळीबारात दोघे ठार, एक गंभीर जखमी

Ulhasnagar firing
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात गुरुवारी अज्ञात समाज कंटकांनी केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला. अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
 
सदर घटना उल्हासनगरात कैलाश कॉलोनी मध्ये रात्री साडेआठच्या सुमारास घडली. अज्ञात हल्लेखोरांनी पीडितांवर एकूण १५ गोळ्या झाडल्या आणि तिथून पळ काढला. 
अचानक झालेल्या हल्ल्यात अनेक गोळ्या लागल्याने दोघांचा मृत्यू झाला तर एक अन्य व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. अमन चौहान आणि अनिल चौहान असे मयतांची नावे आहेत.
जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती मालवाहतुकीचा व्यवसाय करत होते. गेल्या महिन्यात, जेव्हा अमन चौहान कैलाश कॉलनीत माल पोहोचवण्यासाठी गेला होता, तेव्हा या प्रकरणातील मुख्य आरोपी सागर आणि लक्ष्मण पाटील यांनी त्या परिसरात व्यवसाय करण्यासाठी खंडणीची मागणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याला धमकी दिली.
ALSO READ: अकोल्यात भीषण अपघात: अकोल्यातील शेगाव-बालापूर रस्त्यावर बस आणि बाईकची टक्कर होऊन भीषण आग
 आरोपी  एका कार आणि काही मोटरसायकलवरून आले आणि एका जुन्या वादावरून त्यांनी २२ वर्षीय अमन , १७ वर्षीय अनिल  आणि त्यांचे काका अर्जुन  यांच्यावर गोळीबार केला.पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट, पुढील तीन दिवस दिलासा नाही