Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घाटकोपर होर्डिंग कोसळल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक

arrest
, रविवार, 9 जून 2024 (13:59 IST)
मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली आहे. होल्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला. तर 100 हुन अधिक जखमी झाले. मुंबई गुन्हे शाखेने  इगो मीडियाचे मालक भावेश भिंडे आणि स्ट्रक्चल प्रमाणपत्र देणाऱ्या अभियंताला अटक केली. या प्रकरणी आणखी दोघांना अटक केली.

मुंबई गुन्हे शाखेने जान्हवी मराठे उर्फ जानवी सोलकर आणि सागर कुंभार याला अटक केली आहे. होर्डिंग बसवून त्याची प्रक्रिया सुरु असताना इगो मीडिया कंपनीत जानवी सोलकर या संचालक होत्या. 
आणि सागर पाटील आणि सागर कुंभार हे होर्डिंग लावण्याचा पदावर असताना त्यांना सर्व माहिती असून देखील त्यांनी काहीच केले नाही. 

13 मे रोजी धुळीचे वादळ आणि अवकाळी पावसात पेट्रोल पंपावर होर्डिंग पडून 17 जणांचा मृत्यू झाला होता , तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. घाटकोपर परिसरातील छेडा नगर येथील पेट्रोल पंपावर 120 फूट x 120 फूट आकाराचा मोठा फलक पडला होता. त्यामुळे ढिगाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात लोक आणि वाहने अडकून पडली होती.  

या प्रकरणात मुख्य आरोपी भावेश भिंडे याला मुंबई गुन्हे शाखेने उदयपूर, राजस्थान येथून ताब्यात घेतले. 
भावेश भिंडे हा होर्डिंगचा मालक असून त्याने एजन्सीने होर्डिंग लावण्यासाठी बीएमसीची परवानगी घेतली नव्हती. भावेश भिंडे याचा वर मुंबई पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.  
 
Edited by - Priya Dixit   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WI vs UGA : वेस्ट इंडीजने युगांडा विरुद्ध 134 धावांनी सामना जिंकून इतिहास रचला