Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत बांधकामाधीन इमारतीचा काही भाग कोसळून दोघांचा मृत्यू

building collapses in Naik Nagar
, सोमवार, 10 जून 2024 (09:30 IST)
रविवारी रात्री मुंबईतील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या पाच मजली इमारतीचा स्लॅब आणि पॅरापेटचा काही भाग कोसळून एक माणूस आणि 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. विक्रोळी परिसरातील कैलास बिझनेस पार्क येथे रविवारी रात्री 11.10 वाजता ही घटना घडल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.
 
या घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले त्यावेळी त्यांनी इमारतीच्या कोसळल्या भागातून त्यांनी दोघांना बाहेर काढले. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. 
 
 सदर घटना रात्री घडली 10 वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेला असता बांधकामाधीन इमारतीचा एक भाग कोसळला आणि त्यात ते दोघे गाडले गेले. नागेश रेड्डी (38) आणि रोहित रेड्डी(10) असे या मयत पिता पुत्राचे नाव आहे.
 
Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्राच्या निकालावर जातीच्या राजकारणाचा किती आणि कसा प्रभाव पडला? - विश्लेषण