पुण्यात पुन्हा दुचाकी जळीत कांड झाले असून,दोघांमधील वादातून रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांना लक्ष्य केल्या आहेत. गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा गुंडांनी गंज पेठेत दुचाकी वाहनांना आपले लक्ष्य केले़आहे. गंज पेठेतील नाल्याजवळ पार्क केलेल्या ५ गाड्यांना कोणीतरी आग लावून पेटवून दिले़. त्यात या पाचही गाड्या जळून खाक झाल्या़. सुदैवाने अग्निशामक दलाची गाडी २ ते ३ मिनिटात तेथे पोहचल्याने ही आग तातडीने विझविली़. दुचाकीच्या मागच्या बाजूला असलेल्या टपऱ्या त्यात सापडून आग भडकण्याची शक्यता होती़. मात्र गंज पेठेतील लहुजी वस्ताद तालीमजवळ नाल्याशेजारी काही जणांनी आपल्या दुचाकी पार्क केल्या, पहाटे सव्वा तीन वाजता कोणीतरी येथील पाचही दुचाकींना एकाच वेळी आग लावली़ होती, ही माहिती अग्निशामक दलाला मिळाली़. अग्निशामक दलाच्या मुख्य केंद्रापासून हे ठिकाण जवळच असल्याने अग्निशामक दलाची गाडी तातडीने तेथे पोहचली़. तोपर्यंत या पाचही गाड्या ४० ते ४५ टक्के जळाल्या होत्या़. जवानांनी पाणी मारुन ही आग तातडीने विझविली़ आहे. शेजारील टपऱ्या देखील आगीत भक्ष्य झाल्या असत्या मात्र वेळीच आग विझवली गेली असून पोलीस आरीपिंचा तपास करत आहेत.