Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

उदयनराजे पोलिसांसमोर अखेर हजर

udayanraje-bhosale
, मंगळवार, 25 जुलै 2017 (11:16 IST)

अटकेची नामुष्की टाळण्यासाठी अखेर खासदार उदयनराजे अखेर पोलिसांसमोर आज हजर झाले आहेत. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तर त्यामुळे त्यांची अटक अटळ होती.  भोसले सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. भोसले यांच्यावर एका उद्योपती कडून  खंडणीची मागणी  केली होती तर  मारहाण केली असा आरोप आहे.  त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात नऊ जणांना अटकही झाली होती.

 लोणंद येथील एका उद्योगाच्या व्यवस्थापकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले अडचणीत सापडले आहेत.  मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दणका देत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. लोणंद येथे सोना एलाईज नावाचा लोखंडाच्या भुकटीपासून विटा तयार करण्याचा कारखाना आहे. तेथे कामगार आंदोलन करत होते. तेव्हा त्या उद्योजकाला मारहाण केली होती.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रामनाथ कोविंद यांचा आज शपथविधी