Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 24 April 2025
webdunia

डॉल्बी वाजणारच, कुठल्याही कोर्टात जायचे ते जावा : उदयनराजे भोसले

udanyanraje bhosale
, मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (09:18 IST)
‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’अशा शब्दात खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला चेतावनी देत डॉल्बी वाजणारच, कुठल्याही कोर्टात जायचे ते जावा. ही धमकी नाही समज आहे, असे खडसावून सांगितले आहे. 
 
दहीहंडी नुकतीच झाली आहे, नौंटकी करणार्‍यांनी नाचता येत नसताना नाचण्याचा प्रयत्न केला. अनंत चतुदर्शीला बघु काय हाय, काय नाय, कसं होत नाय, डॉल्बी तर वाजणारच. कोण बी येतंय, फॉरेनची पाटलीण ठरवतंय, तुमच्या आमच्या सारखी आवली लोकं? असे म्हणत स्वत:ची कॉलर उडवली. 
 
गणपतीत डॉल्बी वाजली तर गणेशभक्तांनाच त्रास होतोय. मग इतरांना त्रास होण्याचं कारण काय? झाला तर सहन करायचा? कारणे द्यायची नाहीत. एवढंच वाटतंय तर जुन्या बिल्डींगा पाडा, डागडूजी करा, नाही तर गप्प बसून गणेशभक्तांचा एक दिवसाचा हट्ट पूर्ण करा. डॉल्बी तर वाजणारच ही धमकी नाही तर समज देतोय. कोणत्या कोर्टात जायचे तर जावा काही फरक पडत नाही, असे सांगितले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

6 जीबी रॅम असलेला मोटो जी 6 स्मार्टफोन भारतात लॉंच