Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उदयनराजे नाराज! प्रतापगडावरील कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत

udayanraje bhosale
, बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (15:20 IST)
शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगडावर होणाऱ्या सोहळ्यास खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीबाबत साशंकता निर्माण झाली होती. परंतु शिवप्रताप दिनानिमित्त साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावरील कार्यक्रमांना खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर उदयनराजे यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले या देखील प्रतापगडावरील कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजे नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी किल्ले प्रतापगडावरील कार्यक्रमांना न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
 
उदयनराजे यांनी प्रतापगडावरील सोहळ्यासाठी उपस्थित राहावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि. 29) रात्री उशीरापर्यंत प्रयत्न केले असल्याची माहिती समोर आली होती. परंतु उदयनराजेंकडून यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला गेला नाही. शिवप्रताप दिनानिमित्त प्रताप गडावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थिती दर्शवणार आहेत. परंतु खासदार उदयनराजे भोसले गैरहजर राहणार आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात नाराजीचा सूर पसरला आहे. परंतु, आज ३ डिसेंबरला रायगडावर होणाऱ्या आंदोलनाची चर्चा उदयनराजे कार्यकर्त्यांशी करणार आहेत. त्यामुळे ते प्रताप गडावर उपस्थित राहू शकणार नाहीत असे सांगितले जात आहे.
 
आज होणाऱ्या प्रतापगडावरील सोहळ्यासाठी उदयनराजे यांनी उपस्थिती लावणे, हे स्वत: मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. उदयनराजे हे शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. ज्या प्रतापगडावर हा सोहळा होत आहे, त्यावर उदयनराजे यांचे नियंत्रण आहे. म्हणून त्यांची उपस्थिती ही राज्यसरकारसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. ते सहभागी व्हावेत यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रयत्न सुरू होते. परंतु, उदयनराजेंनी त्याला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. उदयनराजे हे साताऱ्यामध्ये आहेत, परंतु ते कार्यक्रमासाठी जाणार नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकमध्ये मृत महिलेच्या बँक खात्यातून “इतके” हजार रुपये काढून फसवणूक