महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून शिवसेना यूबीटी गटाने महाविकास आघाडीची स्थापना केली मात्र आता शिवसेनेने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आदित्य ठाकरेंच्या फायद्यासाठी शिवसेनेने माविआशी संबंध तोडल्याचे वृत्त समोर येत आहे. असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
स्थनिक स्वराज्य निवडणूक एकट्याने लढवण्याचा निर्णय आणि महाविकास आघाडीमधून वेगळे होण्याचा निर्णय आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेतल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.
तसेच प्रकाश आंबेडकरांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.वैयक्तिक फायदा काय आहे हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
या पूर्वी शिवसेना यूबीटीचे नेते खासदार संजय राउत यांनी स्वतः शिवसेना यूबीटी पक्ष आगामी महापालिका निवडणुकीसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.