Publish Date: Wed, 29 Mar 2017 (09:00 IST)
Updated Date: Wed, 29 Mar 2017 (09:02 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवा बंगला बांधत आहेत. 'मातोश्री' बंगल्याजवळ कलानगरमध्येच ही आलिशान सहा मजली इमारत उभी राहत आहे. उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये कलानगरमधील एक प्लॉट 11.60 कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यातील 10 हजार चौरस फुटांपेक्षा जास्त जागेवर ते आपलं नवं घर बांधत आहेत. 'तलाटी अँड पांथकी' ही प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी ही इमारत बांधत आहे.या इमारतीत बेसमेंट, स्टिल्ट आणि सहा मजले आहेत. त्यातील प्रत्येक फ्लॅटमध्ये पाच बेडरुम, एक स्टडी रुम, असणार आहे.