Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

उद्धव यांचे मन एवढे मोठे नाही, राणे यांचा टोला

Uddhav's mind is not so big
, गुरूवार, 8 जुलै 2021 (15:29 IST)
राज्यातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. यावर शिवसेनेकडून  राणे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.  राणे यांनी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर यांनी मीडीयाशी बोलताना सांगितले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांचा मला फोन आला. त्यांनी मला शुभेच्छा दिल्यात. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना फोन आला नाही, हे सांगताना उद्धव यांचे मन एवढे मोठे नाही, असा राणे यांनी टोला लगावला.
 
राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान शरद पवारांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या खोचक टीकेलाही नारायण राणे यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का, असे विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, नाही. त्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यांचे मन इतके मोठे नाही. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि जिल्ह्यांमधून मला शुभेच्छा मिळाल्यात या मी त्यांच्या शुभेच्छा समजतो, असा खोचक टोला लगावला. दरम्यान शरद पवार यांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली. त्यांनी चांगले काम कर, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वीज कोसळल्याने 27 शेळ्या ठार झाल्या