Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येण्याची उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद घेऊन घोषणा

uddhav thackeray
, शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (14:43 IST)
ShivSena sambhaji brigade : राजकारणातून महत्त्वाची बातमी येत आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणार आहेत, या संदर्भात आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली .
 
शिवसेना आणि  संभाजी ब्रिगेड एकत्र येण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली .शिवसेनेच्या 40 आमदारांनी पुकारलेल्या बंड नंतर लोकशाही धोक्यात आल्यामुळे संभाजी ब्रिगेडने शिवसेनेशी युती करण्याचे निश्चित केले त्यासाठी आम्ही नवे समीकरण जुळवून एक मेळावा घेण्याचे संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडकर म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था ते विधानसभापर्यंत आम्ही एकत्र राहणार आहोत. 
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन मोठा आहेस घडवू शकते. आपले वैचारिक म्हणणे पटले आहे म्हणूनच आपण एकत्र आलो आहोत. आमचं हिंदुत्व संभाजी ब्रिगेडला पटल्यामुळे संभाजी ब्रिगेडचा साथ लाभला आहे. ही आपली वैचारिक युती झाली आहे. आम्ही एकत्र मिळून काम करू.  आमच्याकडे काही नसता सोबत आल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कौतुक आहे. शिवरायांचा महाराष्ट्र आहे असं काही जण म्हणतात पण तसं वागत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

औरंगाबाद :बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू