Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाकरी बाणा; भाजपवर आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले...

uddhav thackeray
, बुधवार, 24 जानेवारी 2024 (09:37 IST)
नाशिक - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माझे चांगले संबंध आहेत पण त्यांचा पक्ष हा धोकादायक आहे. त्याच्या विरोधात माझी लढाई आहे असे प्रतिपादन ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
 
ते पुढे म्हणाले की, आता नरेंद्र मोदी यांच्या नावाने मत मिळणार नाहीत म्हणून रामाचा उपयोग करीत आहे. तो चुकीचा आहे आपण दहा वर्ष जनतेला काय दिले याचा हिशोब जनतेला द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
शिवसेना ठाकरे गटाचे अधिवेशन नाशिक मध्ये संपन्न झाले या अधिवेशनामध्ये आज सकाळी डेमोक्रसी येथे पदाधिकाऱ्यांना संबोधित केल्यानंतर सायंकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनसभेला संबोधित करण्यासाठी हुतात्मा अनंत कार्यालय मैदान या ठिकाणी आले.
 
त्या ठिकाणी त्यांचे स्वागत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागुल, माजी आमदार वसंत गिते, नाशिक रोड व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, देवानंद बिरारी, सुनील गोडसे, राजू वाकसरे, व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले.  व्यासपीठावर शिवसेना नेते खा. संजय राऊत, माजी मंत्री आ. आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, खा.विनायक राऊत, खा.अरविंद सावंत, अनिल परब, व अन्य नेते उपस्थित होते.
 
नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानात जनसभेला संबोधित करताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कडाडून हल्ला केला. ते म्हणाले की भाजपाची जी निती आहे ती अतिशय चुकीची आहे.

घर फोडले पक्ष फोडला पण पक्षामध्ये असणाऱ्या भ्रष्टाचारांना त्यांनी पाठिंबा दिला असा गंभीर आरोप त्यांनी केला. आज तुम्ही हिंदू धर्मावर मत मागतात पण जो हिंदू धर्म ज्या शिवसेनाप्रमुखांनी शिकवला त्या शिवसेनेशी आपण गद्दारी करत आहात. ही पद्धत किती योग्य आहे असा प्रश्न उपस्थित करून तुम्हीच आता हिंदू धर्माचे शंकराचार्य यांना देखील मानण्यास तयार नाही याचा अर्थ काय निघतो असा प्रश्न उपस्थित केला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि माझी मैत्री आहे त्यामध्ये काही कोणी शंका घ्यायची गरज नाही पण आज ज्या पद्धतीप्रमाणे महाराष्ट्राला सर्व ठिकाणावर ठेंगा दाखवला जात आहे हे योग्य नाही ते आम्ही खपून घेणार नाही. आपण देशाचे पंतप्रधान आहात त्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
 
उपस्थित जनसमुदायाला विचारले की आजपर्यंत तुमच्या गावात किती रोजगार मिळाले, किती विकास काम झाली. जनतेने यावेळी तरी विचार करून मतदान करावे जर हिम्मत असेल तर भाजपाने बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यावी, ई व्हि एम मशीन बंद करावे अशी मागणी केली. भाजपा मध्ये आज भष्ट्राचाऱ्यांना मान आहे मात्र शकराचार्यांना नाही, महाराष्ट्र अडचणीत असताना मोदीजी कुठे होते आता फक्त मतांसाठी येत आहेत असे आरोप यावेळी ठाकरेंनी केले.
 
सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की तुम्ही तर शिवसेना फोडली शिवसेनेचा गट फोडला पण आता त्यावरही तुमच्या समाधान होत नाही का जे मूळ शिवसेनेमध्ये आहे त्या नेते आणि कार्यकर्त्यांना विनाकारण आपल्या सरकारी यंत्रणेने वेठीस धरणे हे कितपत योग्य आहे. आपल्याला निवडणुकीमध्ये विषाचा पेला पिण्याची इच्छा आहे का हे आपणच ठरवावे आणि त्या पद्धतीप्रमाणे मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

International Education Day 2024 आज आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस, जाणून घ्या थीम आणि महत्त्व