Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरे भाजपाचा उल्लेख भाXXX जनता पक्ष असा केला

Webdunia
सोमवार, 11 मार्च 2024 (09:16 IST)
गेल्या काही दिवसांपासून भाजपावर घणाघाती टीका करत असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील गोरेगाव येथे झालेल्या सभेमध्ये भाजपावर शिवराळ भाषेत बोचरी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपाचा उल्लेख भाXXX जनता पक्ष असा केला.
 
यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही लोकांनी मेहनतीने शिवसेनेचा किल्ला अभेद्य ठेवला आहे. मुळामध्ये प्रश्न आहे की शिवसेना म्हणजे नेमकं आहे काय? जो काही आता भाXXX जनता पक्ष आहे. हो मी बीजेपीला भाXXX जनता पक्षच म्हणतोय. कारण यांच्यामध्ये कोणीही नेता उरलेला नाही. विचार नाही. कुणी आदर्श नाही, म्हणून यांनी अशोक चव्हाणांना घेतलं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
 
किती वर्ष झाली, आणीबाणीनंतर हा पक्ष जन्माला आला. त्याआधी जनसंघ होता. संघाला पुढच्या वर्षी १०० वर्षे होत आहेत. पण १०० वर्ष नुसती भाकड. नुसती शिबिरं झाली. मंथन शिबीर, हे शिबीर, ते शिबीर, पण काहीच निर्माण करू शकले नाहीत. म्हणून त्यांना वरपासून खालपर्यंत बाहेरच्या पक्षातील लोकं आयात करावी लागतात, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments