"मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असतं, तर त्यांनी आणखी काय वेगळं केलं असतं? कारण यांची भूक भागत नाहीये. यांना मुख्यमंत्रिपद पण हवंय आणि आता यांना शिवसेनाप्रमुख व्हायचंय. शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलेत हे आता. राजकारणात ज्या आईने जन्म दिला, त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद आहे," ही राक्षसी महत्वकांक्षा आहे आणि याला हावरटपणा म्हणतात... तुझं तेही माझं... माझं तेही माझं... ह्याचं तेही माझं... आणि त्याचं तेही माझं.. अशी सगळी ही वृत्ती आहे.. हावरटपणाला सीमा नसते," ज्यावेळी शिवसेनेने यांना आधार दिला, त्यावेळी ही सगळी साधी लोकं होती, त्यांना सगळं काही देऊन माझी चूक झाली. त्यांना ताकद दिली, त्यांनी त्या ताकदीने फक्त माझ्यावर फक्त पलटवारच नाही केला तर राजकारणामध्ये ज्या आईने त्यांना जन्म दिला त्या आईलाच गिळायला निघालेली ही अवलाद आहे. मी ज्यावेळी रुग्णालयात होतो त्यावेळी काही जणांनी बाहेर हालचाली सुरु केल्या होत्या, काही जणांनी माझी प्रकृती सुधारणार नाही यासाठी देव पाण्यात ठेवले होते. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी सामनाचे कार्यकारी प्रमुख संजय राऊत यांना मुलाखत दिली, त्यात त्यांनी असं म्हटलं.