Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संभाजीनगर नामकरणाच्या नावावर उद्धव ठाकरे यांची गुगली

uddhav
, गुरूवार, 9 जून 2022 (08:26 IST)
शिवसेना नेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत बहुर्चित औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावर गुगुलीच टाकली. संभाजीनगर नाव करण्यापुर्वी संभाजी राजेंना आदर्श वाटेल, असे शहर करेल, त्यानंतर नामकरण करेल, असे सांगत महाविकास आघाडीतील सरकारमध्ये नामकरणावरुन असलेली मतभेदाची अडचण सोडवण्याचा प्रयत्न केला.
 
उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, संभाजीनगरचे नामकरण कधीही करु शकतो. परंतु त्यापुर्वी या शहराचा विकास करायचा आहे. हा विकास संभाजी राजेंना अभिमान वाटावा, असा करायचा आहे. यामुळे शहरात विकासाची कामे सुरु आहे. परंतु नामकरणाचा पहिला टप्पा म्हणून औरंगाबाद विमानतळाचे नामकरण संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. परंतु हा प्रस्ताव अजून मंजूर झाली नाही. भाजप शहराचा नामकरणावर राजकरण करत आहे, त्याऐवजी त्यांनी विमानतळाचे नामकरण करण्यात यावे.

असा आहे संभाजीनगरचे प्रवास
1988 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभा घेतली. याच सभेत त्यांनी या शहराचं नाव औरंगाबादऐवजी संभाजीनगर करण्याची घोषणा केली. त्यानंतर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यासाठी जून 1995 मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेत ठराव झाला. हा ठराव मंजुरीनंतर राज्य सरकारकडे पाठवला. त्यावेळी राज्यात युतीचं सरकार होतं. मंत्रिमंडळाने ते मंजूर केले. परंतु मंत्रिमंडळाच्या या निर्णयाला आधी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं. 1996 मध्ये राज्य सरकारनं संभाजीनगर नावावर अधिसूचनाही काढली. या अधिसूचनेलाही सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. त्यावेळी आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी संभाजीनगरची अधिसूचना मागे घेतली. पुन्हा 2010च्या औरंगाबादमध्ये महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपने सत्ता मिळवल्यानंतर 2011मध्ये महापालिकेनं औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असल्याने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यानंतर 2015 आणि 2017 मध्येही नामांतराची मागणी झाली. 6 जानेवारी 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला औरंगाबाद विमानतळाचे नाव संभाजीनगर करण्याचे पत्रही लिहिलं होतं.
 
काँग्रेसचा नामकरणास विरोध
कॉंग्रेसचा शहराच्या शहराच्या नामांतराला विरोध आहे. आणि राज्यातील सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर आहे. यामुळे नामकरणाची मोठी अडचण शिवसेनेसमोर आहे. यामुळे आजच्या सभेत नामकरणाचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी गुगली टाकून टाळला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रकांत खैरेंनी किरीट सोमय्यांचा घेतला समाचार