Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

मेहबुबा मुफ्तींच्या शेजारी बसले उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray sat next to Mehbooba Mufti
पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी उद्धव ठाकरे बसलेले पाहून मला आश्चर्य वाटले, असे म्हणत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. विशेष म्हणजे, शुक्रवारी पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत उद्धव ठाकरे, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसलेले पाहून मला आश्चर्य वाटले, जे पूर्वी काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती केल्याबद्दल आम्हाला (भाजप) प्रश्न विचारायचे.
 
विरोधकांच्या सभेवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, सर्व घराणेशाही पक्ष आपल्या कुटुंबांना वाचवण्यासाठी युती करत आहेत. ते म्हणाले, 2019 मध्येही असेच प्रयत्न करण्यात आले होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 2024 मध्येही भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2022 मध्ये रस्ते अपघातात 15 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू, दुचाकी चालकांची संख्या अधिक