Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मागे का? - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मागे का? - उद्धव ठाकरे
मुंबई , बुधवार, 5 एप्रिल 2017 (11:08 IST)
कर्जमाफीची घोषणा म्हणजे फक्त निवडणूक जुमला नाहीत, हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दाखून दिले. उत्तर प्रदेशसारख्या देशातील सगळ्यात मोठ्या रज्यात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊ शकते, तर मग कृषिप्रधान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मागे का राहावे. असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊन देशातील दाबलेल्या, पिचलेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांच्य पावलावर पाऊल ठेवून राज्यातील शेतकर्‍यांनाही कर्जमाफीची घोषणा करावी. अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

येत्या ६ महिन्यात व्हॉट्सअॅपवर डिजीटल पेमेंट सुरु होणार