काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांची हत्या कसाब ने केली नसून एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने ठार झाले. उज्ज्वल निकम यांना हे माहित असून त्यांनी लपवून ठेवलं उज्ज्वल निकम देशद्रोही आहे.त्यांना भाजपने तिकीट देऊन देश्द्रोहीला पाठीशी घातलं आहे. असे वक्तव्य केले होते त्यावर उज्ज्वल निकम यांनी पलटवार केला आहे.
ते म्हणाले की, काँग्रेस नेते कोणताही मुद्दा मांडत असतात. भाजपने माझी उमेदवारी जाहीर केल्यापासून काँग्रेसने माझ्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. आज विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त विधान केले होते की, दहशतवादी अजमल कसाब याने पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांची हत्या केली नसून आरएसएसशी संबंधित एका पोलीसाने त्यांना गोळ्या घातल्या होत्या. उज्ज्वल निकम हे देशद्रोही आहेत. ही वस्तुस्थिती कोणी लपवली. उज्ज्वल निकम हे 26/11 च्या खटल्यातील सरकारी वकील होते
ते म्हणाले की, काँग्रेस नेते कोणताही मुद्दा मांडत असतात. भाजपने माझी उमेदवारी जाहीर केल्यापासून काँग्रेसने माझ्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. आज विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त विधान केले होते की, दहशतवादी अजमल कसाब याने पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांची हत्या केली नसून आरएसएसशी संबंधित एका पोलीसाने त्यांना गोळ्या घातल्या होत्या. उज्ज्वल निकम हे देशद्रोही आहेत. ही वस्तुस्थिती कोणी लपवली. 26/11 च्या हल्ल्यात तुकाराम ओंबळे, हेमंत करकरे हे शहीद झाले. कांग्रेस त्यातील शहीद झालेल्या सर्व जवान, अधिकाऱ्यांच्या हौतात्म्याचा अपमान करत आहे. कसाब ने स्वतः हेमंत करकरे यांना मारल्याची कबुली दिली. त्याच्या गोळीने ते शहीद झाले आणि तुम्ही असं म्हणताय.
उज्ज्वल निकम पुढे म्हणाले, सध्या विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण असून ते माझ्यावर कोणतेही चुकीचे आरोप करत आहे. पाकिस्तानला मदत करणे हा काँग्रेसचा अजेंडा आहे.काँग्रेसचे काम देशातील जनतेच्या मनात शंका निर्माण करणे आहे. काँग्रेसकडे कोणताही मुद्दा नाही, म्हणून त्यांना पाकिस्तानातून कथन पाठवले जाते.कसाबचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले असून कसाबवरील आरोप सिद्ध झाले. तरीही कसाब निर्दोष असल्याचे काँग्रेस पक्षाला वाटत आहे.