Ulhasnagar :उल्हासनगरच्या एका नर्सिंग होम मध्ये 22 दिवसांच्या एका लहान बाळाची खरेदी विक्री होत असल्याचा माहिती ठाणे क्राईम ब्रँचला मिळाल्यावर त्यांनी उघड केला असून या प्रकरणात 5 जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प न. 3 येथे एकाच नर्सिंग होम मध्ये अवघ्या 22 दिवसांच्या बाळांच्या खरेदी विक्री होत असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रँचला मिळाल्यावर त्यांनी बुधवारी धाड टाकली आणि या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे.
या नर्सिंग होम मध्ये लहान बाळांची खरेदी होत असल्याची माहिती समाजसेविका सानिया हिंदुजा आणि सोनू पंजाबी यांना मिळाली होती. त्यांनी ठाणे क्राईम ब्रॅन्चशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. पोलिसांनी नर्सिंग होम मध्ये एका महिलेला बनावट ग्राहक बनवून पाठविण्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
सदर महिला नर्सिंग होम मध्ये गेल्यावर तिने मला दोन मुली असून मुलगा हवा असल्याची मागणी केली. असं म्हटल्यावर 22 दिवसांच्या बाळाचा 7 लाखात सौदा झाला. नर्सिंग होमचे डॉक्टर आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी एकूण 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.