केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाडला नेण्यात येत आहे. महाडच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात येणार आहे. त्यामुळे या पोलीस स्टेशनबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोकण आय जी संजय मोहिते, पोलीस अधीक्षक अशोक दुधे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये हजर आहेत. राणेंना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे. 1 एसआरपी कंपनी , 4 डीवायएसपी, 20, पोलीस निरीक्षक, धडक कृती दल असा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान नाशिक आणि पुणे पोलीसांच्या टीमही महाडमध्ये पोहचले.
राणेंना आधी संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथून त्यांना रायगड पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर त्यांना महाडमध्ये नेण्यात आलं. राणेंनी रत्नागिरी कोर्टात जामीनासाठी अर्ज केलाय. मात्र प्रकृतीच्या कारणानं राणेंचा मुक्काम महाडमधील रुग्णालयात किंवा गेस्ट हाऊसवर होण्याची शक्यता आहे.