Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनोखी शिक्षा : २ दोन झाडे लावा आणि दिवसातून ५ वेळा नमाज अदा करण्याचे आदेश

plantation
, बुधवार, 1 मार्च 2023 (21:45 IST)
नाशिक जिल्हा न्यायालयने प्राणघातक हल्ल्याप्रकरणी एका व्यक्तीला तुरुंगात पाठवण्याऐवजी जी शिक्षा ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले आहे. न्यायालयाने दोषीला २१ दिवस दररोज दोन झाडे लावण्याचे आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्याचे आदेश दिले आहेत. मारहाणीत दोषी आढळलेला तरुण हा मुस्लिम आहे. यामुळेच त्याला दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्यासचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायदंडाधिकारी तेजवंत सिंग संधू यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे की, पुन्हा गुन्हा करणार नाही याची खात्री करण्यासाठी इशारा किंवा वाजवी ताकीद दिल्यानंतर संबंधित दोषीसा सोडण्याचा अधिकार प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर्स कायद्यातील तरतुदी एखाद्या दंडाधिकाऱ्याला देतात. सध्याच्या प्रकरणात केवळ चेतावणी पुरेशी होणार नाही आणि दोषीला त्याची शिक्षा लक्षात ठेवणे महत्वाचे आहे जेणेकरून तो त्याची पुनरावृत्ती करू नये.
न्यायालयाच्या आदेशात असे म्हटले आहे की, ‘माझ्या मते, वाजवी चेतावणी देणे म्हणजे गुन्हा झाला हे समजून घेणे. आरोपीवर गुन्हा सिद्ध झाला असून त्याने पुन्हा गुन्ह्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हे लक्षात ठेवावे.
२०१०मध्ये एका व्यक्तीवर कथितपणे हल्ला केरणे आणि रस्ता अपघाताच्या वादातून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी रौफ खान (वय ३०) हा आरोपी होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. सुनावणीदरम्यान खान याने सांगितले की, तो नियमितपणे नमाज अदा करत नाही. हे पाहता न्यायालयाने त्याला २८ फेब्रुवारीपासून २१ दिवस दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्याचे, सोनापुरा मशीद परिसरात दोन झाडे लावण्याचे आणि या झाडांची काळजी घेण्याचे आदेश दिले.
खान याच्यावर आयपीसी कलम ३२३ (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), ३२५ (स्वैच्छिकपणे गंभीर दुखापत करणे), ५०४ (शांतता भंग करण्यासाठी हेतुपुरस्सर अपमान) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने खानला आयपीसीच्या कलम ३२३ अन्वये दोषी ठरवले आणि इतर आरोपातून निर्दोष मुक्त केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने पाच एकर कोबीवर फिरविला नांगर फोटो