Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाविद्यालयीन निवडणुका आता नोव्हेंबर होणार

महाविद्यालयीन निवडणुका आता नोव्हेंबर होणार
राज्यात तब्बल २५ वर्षांनी ऑगस्टमध्ये होणाऱ्या महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाविद्यालयीन निवडणुकीसाठी सुरक्षा पुरवणं शक्य नसल्याने त्या पुढे ढकलाव्यात अशी विनंती राज्याच्या गृहविभागाने राज्य सरकारला केली होती. ही विनंती लक्षात घेऊन राज्य सरकारने ऑगस्टमध्ये होणाऱ्या निवडणुका नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. 
 
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका आणि जम्मू काश्मिरमधील परिस्थिती लक्षात घेता महाविद्यालयीन निवडणुकीपेक्षा इतर ठिकाणी सुरक्षा पुरवणं आवश्यक असल्याचं गृह विभागाने राज्य सरकारला कळवलं होतं. केंद्र सरकराने राज्यातील नक्षल भागातील सीआरपीएफच्या सहा तुकड्या जम्मू काश्मिरमध्ये तैनात केल्या आहेत.
 
सध्या राज्यातील पोलीस दलाची प्राथमिकता राज्यातील सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करण्याची असल्याचं सांगत गृह विभागाने महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणारं पत्र राज्य सरकारला पाठवलं होतं.  गृहविभागाच्या या पत्रानंतर राज्य मंत्रिमंडळाने महाविद्यालयीन निवडणुका ऑगस्टऐवजी नोव्हेंबर महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गृह, वाहन आणि अन्य कर्जे स्वस्त होण्याची शक्यता