Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उमरखेड तालुक्यात अज्ञातांनी एसटी बस पेटवली, सर्व प्रवासी सुखरूप

उमरखेड तालुक्यात अज्ञातांनी एसटी बस पेटवली, सर्व प्रवासी सुखरूप
, शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (10:26 IST)
उमरखेड तालुक्यात गोजेगाव नजीक पैनगंगा पुलावर अज्ञात महामंडळाची एसटी बस पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने बसमधील 73 प्रवासी सुखरूप आहे. 
 
नांदेड आगाराची नांदेड- नागपूर बस रात्री 11 वाजेच्या सुमारास एसटी महामंडळाची बस एका अज्ञात मोटारसायकल स्वाराने बस थांबवली त्याच्या सोबत पाच -सहा होते. बस थांबलेली पाहून सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. या अज्ञातांनी बसवर पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. 

सुदैवाने बसमधील सर्व 73 प्रवासी सुरक्षित आहे. या घटनेमुळे बसचे सुमारे 32 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस पेटवणारे कोण होते हे समजू शकले नाही. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून प्रकरणाचा तपास करत आहे.  



Edited by - Priya Dixit   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mukesh Ambani Death Threat: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी