Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अपर क्रस्ट फूड अँड वाईन शोमध्ये खवय्यांनी चाखली अनोख्या पदार्थाची चव

अपर क्रस्ट फूड अँड वाईन शोमध्ये खवय्यांनी चाखली अनोख्या पदार्थाची चव
मुंबई , शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017 (16:22 IST)
यू.एस. क्रॅनबेरीज, वॉशिंग्टनची सफरचंदे, यूएसए पीयर्स, कॅलिफोर्नियाचे अक्रोड आणि यू.एस. पिकन्ससह कल्पक पाकक्रिया आणि कॉकटेल्सच्या निर्मितीद्वारा प्रेक्षकांना थक्क केले

मुंबईमध्ये आयोजित अपर क्रस्ट फूड अँड वाईन शोमध्ये नव्या शेफ्स आणि मिक्सोलॉजिस्ट्ससाठीकलिनरी आणि मिक्सोलॉजि कॉम्पिटिशनचे आयोजन झाले. या शोला अग्रीकल्चरल अफेअर्स, यू.एस. कन्स्यूलेट जनरल, मुंबईसाठी सीनियर अग्रीकल्चरल अटॅची, श्री. अॅडम ब्रॅन्सन आणि इतर मान्यवरांनी उद्घाटन समारंभास उपस्थित राहून सुरुवात केली. या प्रसंगी बोलताना श्री. अॅडम ब्रॅन्सन म्हणाले, “या पाककलेच्या महोत्सवाचा एक भाग बनतांना मला अतिशय आनंद होत असून आमच्यासाठी भारत एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सर्वोत्कृष्ट उत्पादने आणण्याची धडपड करत आहोत. हा शो यू.एस. प्रीमियम अग्रीकल्चरल प्रॉडक्ट्सचा स्वाद व अनुभव घेण्यासाठी आमच्या ग्राहकांना एक चांगली संधी आहे.”

मुंबई आणि इतर भागातील १७ हून अधिक शेफ्स आणि मिक्सोलॉजिस्ट्सच्या सहभागामुळे कलिनरी आणि मिक्सोलॉजि कॉम्पिटिशनला चांगले यश मिळाले. उत्साही आणि प्रतिभावान शेफ्स यू.एस. क्रॅनबेरीज, वॉशिंग्टनची सफरचंदे, यूएसए पीयर्स,कॅलिफोर्नियाचे अक्रोड आणि यू.एस. पिकन्स अशा यू.एस. प्रीमियम अग्रीकल्चरल प्रॉडक्ट्सच्या सर्वोत्तम उत्पादनांचा मुख्य घटक म्हणून वापर करत कल्पक अशा पाकक्रिया बनविल्या. ट्रायडेंट (वांद्रे - कुर्ला) मधून शेफ्स विकास विभूती आणि हयात्त रिजन्सी मधून विशाल हरीहरण यांना अनुक्रमे या कलिनरी आणि मिक्सोलॉजि कॉम्पिटिशनचे विजेते घोषित करण्यात आले. विजेत्यांना पाककला आयोजन समितीचे सदस्य, प्रतिष्ठित उद्योग आणि यूएसडीए प्रतिनिधी यांनी बनलेल्या प्रतिष्ठित ज्युरीने निवडले.

या पुढाकाराबद्दल बोलताना, यू.एस. प्रीमियम अग्रीकल्चरल प्रॉडक्ट्सचे इंडिया रिप्रेझेंटेटिव, श्री. कीथ सुंदरलाल म्हणाले: “यू.एस. प्रीमियम अग्रीकल्चरल प्रॉडक्ट्सच्या वापरणे अशा नाविन्यपूर्ण पाककला बनविण्यासाठी कलिनरी आणि मिक्सोलॉजि कॉम्पिटिशनच्या विजेत्यांचे अभिनंदन करताना मला अतिशय आनंद होत आहे. निश्चितच, स्पर्धकांनी या स्पर्धेला त्यांच्या कामगिरीने एका चांगल्या पातळीवर नेले आहे. सहभागी स्पर्धकांकडून मिळालेल्या प्रतिसादापासून आम्ही अतिशय प्रोत्साहित झालो असून या शोच्या या यशाकडे पाहता, आमच्या प्रेक्षकांना हा शो नक्कीच आवडला याची खात्री वाटते.” 

 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक बघतात पॉर्न