Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंकीपॉक्सविरोधात महाराष्ट्रातच लस तयार होणार

monkey pox
, सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (22:07 IST)
मंकीपॉक्सविरोधात महाराष्ट्रातच लस तयार केली जाणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ज्या संस्थांना मंकीपॉक्सविरोधात लस बनविण्याची इच्छा आहे अशा संस्थांना अर्ज करण्याची मागणी केली होती. यात खासगी लस उत्पादक कंपन्यांसह मुंबईतील परळमधील राज्य शासनाच्या हाफकिन प्रशिक्षण संशोधन आणि चाचणी संस्थेने लस बनविण्यासाठी तयारी दर्शवली आहे.
 
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या मंकीपॉक्सचे 8 रुग्ण आढळून येत आहेत. यात दिल्ली आणि केरळमध्ये मंकीपॉक्सच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला, मात्र महाराष्ट्रात मंकीपॉक्सचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र देशातील मंकीपॉक्स रुग्णसंख्या लक्षात घेता ही लस भविष्यात फायदेशीर ठरू शकते.
 
हाफकिन ही देशातील सर्वात जुनी संस्था असून तिची स्थापन 1899 मध्ये झाली आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध रोगांवर लस निर्मिती करण्याबरोबरचं त्यासंदर्भात प्रशिक्षण आणि संशोधनही केले जाते. या संस्थेक़डे लस बनविण्यासाठी पुरेशी साधन सामग्री आहे. यात जर आयसीएमआरने लस बनविण्यास परवानगी दिली तर या संस्थेत सर्व प्रकारच्या लस उत्पादन पूर्वीच्या आणि लस तयार झाल्यानंतरच्या चाचणीची व्यवस्था आहे. याच ठिकाणी जर लस तयार झाली तर त्याचे उत्पादन यात परिसरातील हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळात केले जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेनेच्या बालेकिल्ला असणाऱ्या भांडुपमध्ये खिंडार