Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गायिका वैशाली माडे राष्ट्रवादीची वाट धरणार

vaishali-mhade
प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली माडे लवकरचं  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरणार आहे. वैशाली 31 मार्च रोजी मुंबईच्या एनसीपी कार्यालयात खासदार सुप्रिया  सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. वैशाली एनसीपीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सांस्कृतिक विभाग प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब  पाटील यांनी दिली आहे. 
 
काही दिवसांपूर्वीचं अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता वैशाली देखील राजकाणाकडे तिचा मोर्चा वळवणार आहे. अशा परिस्थितीत असं लक्षात येत आहे,की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याच्या तयारीत आहे.संजय लिला भंसाळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' सिनेमातील ‘पिंगा’ हे गाणं वैशालीच्या आवाजात स्वरबद्द करण्यात आलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संजय राऊत : 'मी ठामपणे सांगतो, अमित शहा-शरद पवार यांची भेट झालेली नाही'