rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्याचे सूत्रधार

Valmik Karad
, शनिवार, 1 मार्च 2025 (18:22 IST)
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणीसाठी करण्यात आली असून या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचे असल्याचे सीआयडीने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.  
या पत्रात म्हटले आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पूर्वी वाल्मिक कराड यांनी आरोपी सुदर्शन घुलेला फोन केला होता. खंडणी प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली असून याचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप सीआयडीने न्यालयात सादर केलेल्या दोषारोप पत्रात केला आहे. 

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर रोजी अपहरण करून करण्यात आली या प्रकरणात आता पर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे. हत्याच्या एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.
ALSO READ: कोकणातील कोरोनाकाळातील बंद गाड्या होळीपूर्वी सुरु होणार
पोलीस त्याचा शोध घेत आहे. हे प्रकरण खंडणी, खून आणि अँट्रासिटीचे आहे आणि याचा सूत्रधार वाल्मिक कराड आहे. संतोष घुले येते संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या केली. असे या पत्रामध्ये म्हटले आहे. तसेच मारहाणीच्या दरम्यान जयराम चाटे याने ग्रुपवर व्हिडीओ कॉल केला हा कॉल देखील सीआयडीच्या हाती लागला आहे. या व्हिडीओ मध्ये सुदर्शन घुले आक्रमकपणे संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

होळीपूर्वी एलपीजीच्या किमतीत वाढ , जाणून घ्या नवे दर