Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वावडदा : वावडदात पोळ्याच्या दिवशी बैल छतावरून पडला

वावडदा : वावडदात पोळ्याच्या दिवशी बैल छतावरून पडला
, शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (10:40 IST)
शुक्रवारी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करत बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शेतकरी बांधवांनी यादिवशी मनोभावे आपल्या बैलांची पूजा केली. त्यांना गोड पुरण पोळीचा नैवेद्य खावू घातला. त्यांचं दर्शन घेतलं, कारण वर्षेभर बैल शेतात राबत असतात.
 
बैलपोळाचा सण साजरा करताना बैल बिथरून घराच्या छतावर चढून खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना जळगावातील वावडदा येथे घडली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, काल राज्यात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. जळगावातील वावडदाच्या गोकुळवाडा  येथे शुक्रवारी पोळा सण साजरा करताना एका शेतकऱ्याचा बैल अचानक बिथरला आणि घरातील छतावर चढला छताला कठडा नसल्यामुळे बैल खाली सिमेंट काँक्रीटच्या रोडवर पडला. या घटनेत बैल गंभीर जखमी झाला असून तातडीने पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले. या अपघातानंतर बैलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Neeraj Chopra:नीरज चोप्राने डायमंड लीग 89.08 मीटर फेक जिंकली, सर्वोत्तम थ्रोसह जिंकणारा पहिला भारतीय ठरला