Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लातूर-उदगीर मार्गावरील अपघातात वाहने जळून खाक, एकाचा मृत्यू पाच जण जखमी

लातूर-उदगीर मार्गावरील अपघातात वाहने जळून खाक, एकाचा मृत्यू पाच जण जखमी
, शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (08:17 IST)
लातूर-उदगीर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. भातखेडा इथल्या मांजरा नदीच्या पुलाच्या पुढे आज पहाटे हा अपघात झाला आहे. डिझेल टँकरला ऊसाच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यामुळे डिझेल टँकरला आग लागली आणि काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रुप धारण केले आणि यामध्ये सात वाहन जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेत डिझेलच्या टँकर चालकाचा मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि डिझेलचा टँकर यांच्यात जोरदार धडक झाली. त्यामुळे टँकरमधील डिझेल रस्त्यावर वाहत होते. अरुंद रस्त्यावर वाहने अडकल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यामध्ये बाजूला जाणारी एक कार बंद पडली. त्या कार चालकाने कार रेस करण्यास सुरुवात केली. कारच्या बाजूला एक बस होती त्यांनी कार रेस करतांना पाहून बसमधील काही प्रवासी खाली उतरले. त्यांनी कार चालकास गाडी रेस करु नको, आग लागू शकते असे सांगितले होते.
 
चालकाने एकला नाही त्याच कार रेस करणे सुरुच होते. यातच सगळ्यात आधी कारने पेट घेतला. बसमधील जो प्रवासी आग लागू शकते असे सागण्यासाठी गेला होता तोही यामध्ये भाजला आहे. रस्त्यावरील डिझेलमुळे काही क्षणात आग सर्वत्र पसरली. टँकर चालक गफार इस्माईल शेख याला तर वाहनातून खाली उतरण्याची संधीही मिळाली नाही. डिझेल टँकर, दोन कार, कापसाचा ट्रक, ऊसाचा ट्रॅक्टर, एसटी महामंडळाची बस अशी सात वाहने जागीच भस्मसात झाली.
 
घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यामधील पाच पोलीस पथके घटनास्थळी तात्काळ दाखल झाली होती. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन लातूर उदगीर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. बाजूलाच असलेल्या मांजरा नदीपात्रामधून पाण्याची सोय करण्यात आल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
 
त्यातच कापसाच्या गाठी वाहतूक करणारा ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे आगीवर नियंत्रण करताना वेळ लागला. एसटी महामंडळची बस आणि दोन कार जागेवर जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, पाच रुग्णवाहिका आणि मोठ्या प्रमाणात हजर असलेल्या पोलिसांनी पुढील हानी टाळण्यासाठी प्रयत्न केले.

Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक शहरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वसतिगृह संचालकाला अटक