Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोबाईल पासवर्डच्या वादावरून गदारोळ, कॅबिनेट मंत्र्यांचे ओएसडी विजय कारंडे यांच्या विरोधात पुण्यात एफआयआर दाखल

मोबाईल पासवर्डच्या वादावरून गदारोळ
महाराष्ट्र सरकारचे मंत्री अतुल सावे यांचे ओएसडी विजय कारंडे यांच्यावर पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आणि मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
ALSO READ: महाराष्ट्रात पुढील आठवड्यात १४ ते २० मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी त्यांचे ओएसडी विजय कारंडे यांच्यावरील गंभीर आरोपांनंतर चौकशीचे आदेश दिले आहे. कारंडे यांच्यावर पुण्यातील त्यांच्या घरी पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आणि अल्पवयीन मुलाला क्रिकेट बॅटने मारहाण केल्याचा आरोप आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
ALSO READ: अशोक खरात प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, भोंदू बाबाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त
सूत्रांनुसार, मोबाईल फोनच्या पासवर्ड आणि चॅट्सवरून झालेल्या वादानंतर ३० एप्रिल रोजी ही घटना घडली. मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे स्पष्टपणे सांगितले.
ALSO READ: नागपूर : गडकरींकडून प्रशंसा मिळवलेले आरटीओ अधिकारी निलंबित
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आणि दोडामार्ग परिसराला चक्रीवादळाचा तडाखा