भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून महाविकास आघाडीचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ चंद्रपूर राजुरा इथला असल्याचे सांगितले आहे.
उपाध्ये यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये विजय वडेट्टीवार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना दिसत आहे. तर हार घालताना विजय वडेट्टीवार यांनी पाय पुतळ्याच्या पायथाच्या भागावर ठेऊन उभे होते. विजय वडेट्टीवारांने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अपमानावर विजय वडेट्टीवार यांच्या वर उद्धव ठाकरे काही एक्शन घेणार का ? की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार ? असे कॅप्शन लिहिले आहे .
या वर प्रतिक्रिया देत असताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे .की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोणत्याही भागावर पाय दिला नाही. विरोधक मला बदमान करण्याचा प्रयत्नात आहे.