महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेसाठी भाजपकडून विजया रहाटकर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे. विजया रहाटकर या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या प्रमुखही आहेत. यापूर्वी त्यांनी औरंगाबादचं महापौरपदही भूषवलं आहे.
याआधी भाजपने महाराष्ट्राच्या कोट्यातून प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन यांची नावं जाहीर केली होती. त्यातच सोमवारी विजया रहाटकरांना भाजपने राज्यसभेच्या मैदानात उतरवलं. त्यामुळे अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक अटळ आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेकडून अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून कुमार केतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.