Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राणे यांनी संघर्ष यात्रेत सहभागी होऊन नेतृत्त्व करावे : विखे पाटील

राणे यांनी संघर्ष यात्रेत सहभागी होऊन नेतृत्त्व करावे : विखे पाटील
, मंगळवार, 9 मे 2017 (17:13 IST)

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी संघर्ष यात्रेत सहभागी होऊन नेतृत्त्व करावे, असे आवाहन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलें आहे. विखे पाटील यांनी शिर्डीत राज्यातील विविधा मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. नारायण राणेंचे संघर्ष यात्रेबाबत विधान वस्तुस्थितीच्या उलट असून संघर्ष यात्रेमुळेच मुख्यमंत्र्यांनी संवाद यात्रा काढली आहे. राज्य सरकारवर दबाव वाढत चालला असून अनेक घोषणा सरकार करत आहे हे संघर्ष यात्रेचच फलीत आहे. नारायण राणे यांनी हे वास्तव समजून घेण्याची आवश्‍यकता आहे असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी माल्याला दोषी