Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निवळेच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करा: विखे पाटील

निवळेच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करा: विखे पाटील
मुंबई: निवळे येथील आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 
 
निवळेच्या गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी ही मागणी केली. ते म्हणाले की, दडपशाही व दंडेली करून निवळे येथील गावकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. मागील 75 वर्षे येथील शेतकरी जमीन कसत असताना संरक्षण खात्याने शेतकर्यांशी चर्चा न करता त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेणे अन्यायकारक आहे. सरकारने सामंजस्य व संयम दाखवून ग्रामस्थांशी संवाद साधण्याची गरज आहे.
 
या घटनेवरून त्यांनी शिवसेनेवरही जोरदार तोफ डागली. ते म्हणाले की, येथील खासदार व आमदार शिवसेनेचे असून, ते सरकारमधील घटक पक्ष आहे. त्यामुळे आंदोलन पेटल्यानंतर राजकारण करण्याऐवजी सरकार म्हणून त्यांनी निवळेच्या गावकऱ्यांना न्याय का मिळवून दिला नाही, अशी संतप्त विचारणाही त्यांनी यावेळी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात भर रस्त्यात बिल्डरवर गोळीबार