Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गृहनिर्माण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा : विखे पाटील

गृहनिर्माण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा :  विखे पाटील

म्हाडाने खासगी विकासकाकडून परत घेतलेला भूखंड राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी पुन्हा त्याच विकासकाला नियमबाह्यपणे परत दिल्याचे प्रकरण विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी समोर आणले आहे.  विखे पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.

ते म्हणाले, पंतनगर, घाटकोपर येथील सीटीएस क्र. 194 हा 18 हजार 902 चौरस मीटरचा भूखंड 1999 मध्ये निर्मल होल्डिंग प्रा. लि. या विकासकाला पुनर्विकसित करण्यासाठी देण्यात आला. मात्र विकासकाने कोणताच प्रतिसाद न दिल्याने म्हाडाने 2006 मध्ये तो भूखंड परत घेतला. परंतु गृहनिर्माण मंत्र्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून हा भूखंड पुन्हा एकदा त्याच विकासकाला दिल्याची माहिती आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने गृहनिर्माण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. या प्रकरणातील अधिक गंभीर माहिती म्हणजे हा भूखंड पुन्हा त्याच विकासकाला देण्यास नकार देणाऱ्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची त्या पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये चौथ्यांदा कपात