रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून सध्याचे खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी देण्यात येणार असून शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय अंतिम असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. यामुळे युती झाली तरीही ही जागा भाजपकडे जाणार नसून यामुळे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना स्वबळावरच लढावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी- सिंधुदुर्गमधील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघालेले आहे. शिवसेना-भाजपमध्ये युतीवरून संभ्रम असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच स्वतंत्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्यावर लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.