दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशातील काही घोळ असतील तर ते बुधवारपर्यंत दूर करण्यात येतील आणि गुरुवारपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासंबंधीचा घोळ मिटवण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विनोद तावडे बोलत होते.अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासून सुरू करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केली आहे. गणिताला पर्यायी विषयच ठेवणार, असंही विनोद तावडेंनी स्पष्ट केलं आहे. गणिताला पर्यायी विषय ठेवण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचं आश्वासनंही तावडेंनी दिलं आहे. सर्व्हर स्लो झाल्यामुळे अनेकांना ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत होत्या. उद्या एक दिवस पूर्ण घेऊन सर्व प्रकारच्या सुधारणा करण्यास दिला आहे आणि टेक्निकल एक्सपर्ट घेऊन मी स्वतः तपासणी करणार असंही विनोद तावडे म्हणाले.दहावीच्या निकालानंतर सर्व विभागात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावतीमध्ये ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे.