Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी रंगभूमीला सरकारचा दिलासा: विनोद तावडे

मराठी रंगभूमीला सरकारचा दिलासा: विनोद तावडे
, बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (10:07 IST)
मराठी नाटकांसाठी भाडयाने नाट्यगृह उपलब्ध करुन देताना त्या नाट्यगृहाचे भाडे रुपये १०००  आणि रुपये ५०० रुपयांच्या जुन्या चलनात स्वीकारण्याची परवानगी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
 
मराठी नाट्य़ व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी व सचिव संतोष काणेकर यांनी आज सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठी नाटकांसाठी नाट्यगृहाचे बुकिंग करताना या नाटयगृहाटे भाडे जुन्या चलनात स्वीकारण्यात अनेक नाटयगृहांनी असमर्थता व्यक्त केली. यामुळे मराठी नाटकांना याचा फटका बसत होता. ज्याप्रमाणे महापालिका व नगरपालिकांना कर रक्कमेची देयके स्वीकारण्यासाठी जुन्या नोटांची सवलत दिली आहे, तश्याच प्रकारची सवलत नाटयनिर्मात्यांना दिल्यास मराठी नाटकांना दिलासा मिळू शकेल अशी विनंती प्रसाद कांबळी यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिस कार्यमंत्री तावडे यांच्याकडे केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत नाट्यगृहांनी नाट्यनिर्मात्यांच्या नाटकाच्या भाड्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची अनुमती देण्यात आल्याची माहिती श्री.विनोद तावडे यांनी दिली.
 
या निर्णयामुळे मराठी रंगभूमीला मोठा दिलासा मिळाला आहे. महानगर पालिका, नगरपालिका व जिल्हापरिषदच्या अंतर्गत असणा-या नाट्यगृहांची भाडे नाटय निर्मात्यांकडून स्वीकारण्यासाठी हा निर्णय लागू होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पहिली चिनी महिला पायलट यू शू यांचा अपघातात मृत्यू