Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट दोन गटात हाणामारी

Violence erupts in two groups over Gram Panchayat by-electionsग्रामपंचायत पोटनिवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट दोन गटात हाणामारी  Marathi Regional News In Webdunia Marathi
, मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (15:17 IST)
राज्यात आज राज्याच्या 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायती आणि भंडारा जिल्हा परिषदेच्या 52 तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या 53 जागांसाठी आज (21 डिसेंबर) मतदान होत आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार OBC प्रवर्गाच्या जागा वगळून उर्वरित जागांसाठी ही निवडणूक होत आहे. राज्यात शांततेत मतदान होत असताना बुलढाण्यात मतदानाला गालबोट लागले आहे. या क्षेत्रात दोन गटात हाणामारी सुरु झाली असून त्यात चार जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत .बुलढाणा जिल्ह्यात जलंब ग्राम पंचायतींसाठी मतदान सुरु असताना दोन गटात वादावादी होऊन हाणामारी झाली .त्यात 4 जण गंभीर रित्या जखमी झाले असून ग्राम पंचायत पोट निवडणुकीला हिंसाचार गालबोट लागले आहे. पोलिसांनी केंद्रावर जाऊन स्थिती नियंत्रणात केली. या हाणामारीत जखमी झालेल्या  मध्ये एका महिलेचा समावेश आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पैशाच्या पावसासाठी अंधश्रद्धेला भुलून , महिलेला जिवंत जाळले