Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेकडून महापौर पदासाठी अर्ज भरणार

विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेकडून महापौर पदासाठी अर्ज भरणार
मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर हे महापौर पदासाठी अर्ज भरणार आहेत. मातोश्रीवर झालेल्या नेत्यांच्या बैठकीत महाडेश्वर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

विश्वनाथ महाडेश्वर हे आतापर्यंत महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून गेले आहेत. मसर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेकडून महापौरपदासाठी रणनीती आखली जात आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी मनोहर जोशी, दिवाकर रावते, सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर, एकनाथ शिंदे, रामदास कदम, संजय राऊत असे सगळेच महत्वाचे नेते उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमूल दुधाच्या दरात प्रति लीटर दोन रुपयांची वाढ