आज वसंत पंचमीच्या निमित्ताने पंढरपुरात विठुरायाच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने आज विठुराया आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा शेकडो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.सकाळ पासूनच मंदिरात लग्नाची जय्य्त तयारी सुरु आहे. मंदिराला रंग-बेरंगी फुलांनी सजविले आहे. लग्न सोहळ्यासाठी विठुराया आणि रखुमाई साठी पांढऱ्या रंगाचे पोशाख बनवले आहे. विठुरायाच्या आंगीवर प्रभू श्रीराम आणि माता सीताच्या चित्रांचे दोरे कामात रेखाटले आहे.
आज सर्व जग व्हेलेंटाईन डे साजरे करत आहे. मात्र जगातील पहिले प्रेमपत्र द्वापार युगात रखुमाईने श्रीकृष्णाला लिहिले होते. त्यांनतर श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले होते. रुक्मिणी स्वयंवराच्या वेळी अनेक राजकुमार राजा महाराजा स्वयंवराची आले होते मात्र रुक्मिणीने श्रीकृष्णाला आपले पती मानले होते. त्यामुळे रुक्मिणीने श्रीकृष्णाला त्यांना हरण करून नेण्यास सांगितलं. श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण लग्नमांडवातून केले असून त्यांच्याशी वसंत पंचमीला विवाह केले होते.
म्हणून आजच्या दिवशी पंढरपुरात विठ्ठल -रुक्मिणीचा विवाह सोहळा साजरा करतात. आज देवांची षोडशोपचार पूजा करून त्यांना पांढरे वस्त्र परिधान केले.
माता रूक्मिणीला पांढऱ्या रंगाची पैठणी नेसवली आहे. गळ्यात दागिने आणि फुलांचा हार घातला आहे. दुपारी बारा वाजता हा लग्न सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे.