Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 29 March 2025
webdunia

आवाज कोणाचा शिवसेनेचा, शिवसेनेचा आज ५२ वा वर्धापन दिन

, मंगळवार, 19 जून 2018 (10:26 IST)
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला समोर ठेवत शिवसेना पक्षाची स्थापना केली होती. आता सत्तेत असलेल्या आणि तरीही मित्र पक्ष भाजपवर जोरदार टीका करत असलेल्या शिवसेना पक्षाचा आज ५२ वा वर्धापन दिन आज अत्यंत दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को संकुलात लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱयांचे राज्यव्यापी शिबीर पक्षाने आयोजित केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या शिबिराला प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
 
शिवसेनेच्या एकदिवसीय शिबिराचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
 
सकाळी ११-शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पदाधिकारी व लोकप्रतिनिधी शिबिराचे उद्घाटन होईल.
पहिले सत्र- (सकाळी ११ ते दु. १) शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी यांचे मार्गदर्शन, उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांचे प्रत्येक बूथवर नावे नोंदवण्याबाबत मार्गदर्शन, आमदार राजेश क्षीरसागर यांचे आंदोलनाबाबत भाषण तसेच उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांचे ‘हिंदुस्थानी सीमेवरील सैनिक रक्षणासाठी की शहीद होण्यासाठी?’ या विषयावर भाषण.
पहिल्या सत्रामध्येच ‘शेती आणि शेतकरी जगण्या- मरण्याच्या फेऱयात’ हे चर्चासत्र होणार असून या चर्चासत्रात मिलिंद मुसगकर (नाशिक), धनंजय जाधव (पुणतांबे-नगर), प्रियंका जोशी (धुळे), राजेश गंगमवार (धर्माबाद-नांदेड) आणि गुलाबराव धारे (नगर) हे सहभागी होणार आहेत. चर्चासत्राचे सूत्रसंचालन आमदार शंभूराजे देसाई करतील.
दुसरे सत्र (दुपारी ३ ते ५)उपनेते खासदार अरविंद सावंत आणि दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवार यांच्या मार्गदर्शनाने या सत्राचा प्रारंभ होईल.
या सत्रातही दोन चर्चासत्रांचा समावेश करण्यात आला आहे. ‘विकासाच्या नावाखालील अरिष्टे’ या चर्चासत्रात राजेंद्र फातर्पेकर, नारायण पाटील आणि श्रीनिवास वनगा सहभागी होणार असून सूत्रसंचालन उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱहे करतील.
दुसऱया चर्चासत्राचा विषय आहे ‘महागाईचा विस्फोट.’ यात जान्हवी सावंत, ज्योती ठाकरे आणि विवेक बेलणकर सहभागी होणार असून सूत्रसंचालन आमदार सुनील प्रभू करणार आहेत.
दोन्ही सत्रे पार पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
प्रसारमाध्यमे आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष
 
सध्या शिवसेनने भाजपा सोबत न जातात येणारी विधानसभा, लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे भाजपाने युती होणार अशी बतावणी सुरु केली आहे. त्यामुळे आजच्या वर्धापन मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांना कोणता संदेश देतात, पक्षाची पुढील दिशा काय असेल, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उद्धव ठाकरे कोणते भाष्य करतात, त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या राजकीय स्थितीला कोणते वळण मिळणार याकडे प्रसारमाध्यमांचे आणि राजकीय क्षेत्राचेही लक्ष लागले आहे. यापूर्वी युती तुटल्याचा ठरावा मांडला गेला आणि तो मंजूर केला आहे. त्यामुळे आता पुढे काय भूमिका शिवसेना घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.आवाज कोणाचा शिवसेनेचा, शिवसेनेचा आज ५२ वा वर्धापन दिन
 
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला समोर ठेवत शिवसेना पक्षाची स्थापना केली होती. आता सत्तेत असलेल्या आणि तरीही मित्र पक्ष भाजपवर जोरदार टीका करत असलेल्या शिवसेना पक्षाचा आज ५२ वा वर्धापन दिन आज अत्यंत दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को संकुलात लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱयांचे राज्यव्यापी शिबीर पक्षाने आयोजित केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या शिबिराला प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
 
शिवसेनेच्या एकदिवसीय शिबिराचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
 
सकाळी ११-शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पदाधिकारी व लोकप्रतिनिधी शिबिराचे उद्घाटन होईल.
पहिले सत्र- (सकाळी ११ ते दु. १) शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी यांचे मार्गदर्शन, उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांचे प्रत्येक बूथवर नावे नोंदवण्याबाबत मार्गदर्शन, आमदार राजेश क्षीरसागर यांचे आंदोलनाबाबत भाषण तसेच उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांचे ‘हिंदुस्थानी सीमेवरील सैनिक रक्षणासाठी की शहीद होण्यासाठी?’ या विषयावर भाषण.
पहिल्या सत्रामध्येच ‘शेती आणि शेतकरी जगण्या- मरण्याच्या फेऱयात’ हे चर्चासत्र होणार असून या चर्चासत्रात मिलिंद मुसगकर (नाशिक), धनंजय जाधव (पुणतांबे-नगर), प्रियंका जोशी (धुळे), राजेश गंगमवार (धर्माबाद-नांदेड) आणि गुलाबराव धारे (नगर) हे सहभागी होणार आहेत. चर्चासत्राचे सूत्रसंचालन आमदार शंभूराजे देसाई करतील.
दुसरे सत्र (दुपारी ३ ते ५)उपनेते खासदार अरविंद सावंत आणि दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवार यांच्या मार्गदर्शनाने या सत्राचा प्रारंभ होईल.
या सत्रातही दोन चर्चासत्रांचा समावेश करण्यात आला आहे. ‘विकासाच्या नावाखालील अरिष्टे’ या चर्चासत्रात राजेंद्र फातर्पेकर, नारायण पाटील आणि श्रीनिवास वनगा सहभागी होणार असून सूत्रसंचालन उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱहे करतील.
दुसऱया चर्चासत्राचा विषय आहे ‘महागाईचा विस्फोट.’ यात जान्हवी सावंत, ज्योती ठाकरे आणि विवेक बेलणकर सहभागी होणार असून सूत्रसंचालन आमदार सुनील प्रभू करणार आहेत.
दोन्ही सत्रे पार पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
प्रसारमाध्यमे आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष
 
सध्या शिवसेनने भाजपा सोबत न जातात येणारी विधानसभा, लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे भाजपाने युती होणार अशी बतावणी सुरु केली आहे. त्यामुळे आजच्या वर्धापन मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांना कोणता संदेश देतात, पक्षाची पुढील दिशा काय असेल, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उद्धव ठाकरे कोणते भाष्य करतात, त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या राजकीय स्थितीला कोणते वळण मिळणार याकडे प्रसारमाध्यमांचे आणि राजकीय क्षेत्राचेही लक्ष लागले आहे. यापूर्वी युती तुटल्याचा ठरावा मांडला गेला आणि तो मंजूर केला आहे. त्यामुळे आता पुढे काय भूमिका शिवसेना घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर