Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Wardha : घरातच पुरला महिलेचा मृतदेह, कारण जाणून हैराण व्हाल

Dead body
, शुक्रवार, 14 जुलै 2023 (15:09 IST)
वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम मध्ये एका महिलेच्या मृत्यू नंतर तिचा मृतदेह घरातच खड्डा करून पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या आदर्श नगर भागात ही घटना घडली आहे. महिलेच्या मृत्यूची घटना तब्बल 10 दिवसानंतर उघडकीस आली.पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे.प्रवीण साहेबराब भस्मे असे या मयत महिलेचे नाव आहे.  
 
वृत्तानुसार, सेवाग्राम येथील आदर्श नगर मधील एका कुटुंबात वृद्ध आई वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार वास्तव्यास होता. अवघे कुटुंब मानसिक आजाराने ग्रस्त असल्यामुळे त्यांचा संपर्क शेजारी नव्हता. दररोज त्यांच्या घरातून आरडाओरडण्याचा आवाज येत होता. नेहमी वाद व्हायचे.या कुटुंबातील मुलगी सुमारे तीन वर्षांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होती. तिच्यावर कोणतेही उपचार केले गेले नाही. या मुलीचा 3 जुलै रोजी मृत्यू झाला. कुटुंबीयांनी रात्रभर तिचे मृदेह तसेच ठेवले. कुटुंबीयांकडे अंत्यविधीसाठी पुरेसे पैसे नसल्याने वडिलांनी मुलाच्या मदतीने घरातच खड्डा खणला. आणि मुलीचा मृतदेह त्यात पुरला. आठवडा झाला तरी ही मुलगी नाही दिसली म्हणून शेजारच्यांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. 

13 जुलै रोजी पोलिसांनी घटनास्थळ गाठून कुटुंबीयांची चौकशी केली त्यात हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 




Edited by - Priya Dixit   
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रीहरीकोटामधून चंद्रयान-3चं यशस्वी लॉन्च